सामाजिक कार्यासाठी अझिम प्रेमजींनी विकले 7,300 कोटींचे शेअर

सामाजिक कार्यासाठी अझिम प्रेमजींनी विकले 7,300 कोटींचे शेअर

बंगळूर: अझिम प्रेमजी आणि विप्रोच्या प्रमोटर समूहाने 7,300 कोटी रुपये मूल्याच्या शेअरची बायबॅकच्या माध्यमातून विक्री केली आहे. या भांडवलातील मोठा हिस्सा सेवाभावी कामासाठी आणि समाजसेवेसाठी वापरला जाणार आहे. विप्रोने 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 32 कोटी इक्विटी शेअरची 325 रुपये प्रति शेअरप्रमाणे बायबॅक करण्याची घोषणा केली होती. बायबॅकसाठी वापरली जाणारी एकूण रक्कम (हे भांडवल टेंडर प्रकाराने वापरले जाणार आहे) 10,499.99 कोटी रुपये इतकी होती. अझिम प्रेमजींच्या मालकी हिश्यातील 2.2 कोटी शेअर या बायबॅकच्या माध्यमातून खरेदी करण्यात आले आहेत. प्रेमजींच्या मालकीच्या एकूण शेअरच्या 3.96 टक्के इतका हा हिस्सा आहे. यातील मोठा हिस्सा हा अझिम प्रमेजी फाऊंडेशनसाठी वापरला जाण्याची चिन्हे आहेत. अझिम प्रेमजी फाऊंडेशन ही जगातील पाचव्या क्रमांकाची आणि आशियातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था आहे.

प्रेमजी जुलै महिन्यात विप्रोच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांचे सुपूत्र रिषाद प्रेमजी यांनी विप्रोची धुरा सांभाळली आहे. 73 वर्षांचे अझिम प्रेमजी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 18 अब्ज डॉलर इतकी आहे.  मार्च महिन्यात त्यांनी विप्रोच्या एकूण शेअरपैकी 34 टक्के शेअर म्हणजेच 52,750 कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले होते. आतापर्यत अझिम प्रेमजी यांनी प्रेमजी फाऊंडेशनसाठी तब्बल 1 लाख 45 हजार कोटी रुपये (21 अब्ज डॉलर) इतकी प्रचंड रक्कम दान केली आहे. आज दिवसअखेर विप्रोचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात 245.20 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता.

Webtitle : marathi news aziz premji sold shares of 7300 cr for social work 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com