भोंदू बाबाने केला 91 महिलांवर बलात्कार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 जुलै 2018

भोंदू बाबाने अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून सुमारे 91 महिलांवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हरणायातील टोहाना येथील बाबा बालकनाथ मंदिरात पुजारी असलेल्या अमरपुरी ऊर्फ बिल्लू याचा महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या बाबास बेड्या ठोकल्या... अमरपुरी ऊर्फ बिल्लू हा प्रेतबाधा झाल्याचे सांगून महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर तंत्रमंत्रांच्या बहाण्याने तो महिलांना बेशुद्ध करणारे औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार करत असे. मग अशा महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळायचा.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live