VIDEO | कृषी खातं झोपलंय काय? बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

साम टीव्ही
रविवार, 23 ऑगस्ट 2020
  • कृषी खातं झोपलंय काय? 
  • बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
  • शिवसेनेला कडूंचा पाठिंबा की धक्का

राज्यातला सोयाबीन शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय. या शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनून बच्चू कडू पुढे सरसावलेत. यावेळी बच्चु कडूंनी थेट शिवसेनेवरच प्रहार केलाय.

शेतकऱ्यांबाबत कृषी विभाग अजिबात गंभीर नसल्याची टीका ठाकरे सरकारवर झालीय. आणि ही टीका दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर सरकारमधल्या एका मंत्र्यानेच केलीय. कृषी खातं झोपलंय का? असा सवाल करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिलाय.

यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे हताश झालाय. जे पेरलं ते उगवलच नाही. सोयाबीनच्या बोगस बियाण्यांसंदर्भात राज्यभरातून तक्रारी येतायत. त्या तक्रारींची दखल घेत खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत दिली जाणार आहे.

'गेल्या 50 वर्षांपासून हेच सुरू आहे. त्यामुळे बोगस  बियाणे बनवणाऱ्या कंपनीच्या मालकालाच  चोपल पाहिजे' 

सत्तेबाहेर असताना आपल्या हटके आंदोलनांनी सरकारला सळो की पळो करून सोडणारे बच्चू कडू शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून आता सरकारमध्ये आहेत. पण त्यांची आजची भूमिका पाहता शिवसेनेला त्यांचा पाठिंबा आहे की बच्चू भाऊ सेनेला धक्का देणार असा सवाल उपस्थित झालाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live