चहाप्रेमींसाठी वाईट बातमी; चहाप्रेमींची तल्लफ कशी भागणार? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

जगभरात एका गोष्टीचं वेड पाहायला मिळतं, ते चहाचं अगदी सकाळी झोपेतून उठलं तरी हवा असतो तो चहाच. त्यातच भारतातील चहाची चव ही जगभरात प्रसिद्ध. त्यातही दार्जलिंग चहा, आसाम चहा, नीलगिरी चहा आणि मसाला चहा यांनी तर चहापानाची चव वाढवलेली. चहाला मोठा इतिहास असला तरीही चहा उद्योगाला देशात हवी तेवढी चालना मिळत नसल्याचं दिसतंय.

जगभरात एका गोष्टीचं वेड पाहायला मिळतं, ते चहाचं अगदी सकाळी झोपेतून उठलं तरी हवा असतो तो चहाच. त्यातच भारतातील चहाची चव ही जगभरात प्रसिद्ध. त्यातही दार्जलिंग चहा, आसाम चहा, नीलगिरी चहा आणि मसाला चहा यांनी तर चहापानाची चव वाढवलेली. चहाला मोठा इतिहास असला तरीही चहा उद्योगाला देशात हवी तेवढी चालना मिळत नसल्याचं दिसतंय.

चहाची मूळ किंमत निश्चित नाहीय. त्यामुळे बाजारात चहाच्या विक्रीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. म्हणूनच देशातील चहाचं उत्पादन आणि विक्री पाहता चहा महागणार असल्याची शक्यता टी-बोर्डाने वर्तवलीय. चहा बोर्ड सध्या चहाची किमान मूळ किंमत ठरवण्याच्या विचारात आहे. चहा व्यापाऱ्यांकडून अनेक काळापासून ही मागणी जोर धरत होती. जेणेकरून या उद्योगाला चालना मिळेल आणि निर्यातही वाढेल. 

उत्पादकांची नेमकी मागणी काय ?
चहाची किंमत निश्चित करण्यात यावी, अशी मागणी लहान उत्पादकांकडून होतेय. कारण या लहान उत्पादकांना मोठ्या उत्पादकांवर अवलंबून राहावं लागतं. स्मॉल टी ग्रोअर (STG) यांचं देशातील एकूण चहा उत्पादनात 35 टक्के योगदान आहे. देशात 2.5 लाख लहान चहा उत्पादक आहेत. या चहा उत्पादकांना प्रती किलोमागे 15 ते 18 रुपये खर्च येतो. तर मोठे उत्पादक त्यांच्याकडून 7 ते 14 रुपये प्रती किलोच्या भावाने चहा विकत घेतात.

आता मात्र चहाच्या किंमती वाढणार

भारतात गेल्या वर्षी 135 कोटी किलोग्राम चहाचं उत्पादन झालं होतं. त्यापैकी 5,132 कोटी रुपयांच्या चहाची निर्यात करण्यात आली होती. या प्रमुख निर्यात बाजारांमध्ये इराण, चीन, संयुक्त अरब अमीराती, पाकिस्तान आणि राष्ट्रकूल देशांचा समावेश होतो. 2019 मध्येही चहाचं उत्पादन गेल्या वर्षी इतकंच राहण्याची शक्यता आहे. मात्र यंदा चहाच्या किंमतीत वाढ होणारेय. खरं तर देशात चहाची विक्री ही दरवर्षी 2.2 टक्क्यांनी वाढतेय. पण आता चहाच महाग होणार असल्याने तो गोड लागणार का हा मुख्य प्रश्न आहे.

WebTitle : marathi news bad news for tea lovers in India


संबंधित बातम्या

Saam TV Live