खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. बुधवारी पहिला कॅम्प अमरनाथच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र मुसळधार पावसामुळे यात्रेवर परिणाम झालाय. पहिल्या तुकडीत एकूण 1904 भाविकांचा समावेश आहे.

अमरनाथ यात्रेची 26 ऑगस्टला सांगता होणार आहे. अमरनाथ यात्रेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहितीही तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे महामार्गावर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विशेष तुकड्या तैनात केल्या आहेत.

प्रथमच सुरक्षेसाठी महिला सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षेसाठी यात्रा मार्गावर सुरक्षा रक्षकांशिवाय ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live