बजरंग पुनिया आणि रवी कुमार टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

नूर - सुलतान (कझाकस्तान) : विनेश फोगट पाठोपाठच आता भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी कुमार हे दोघेही जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. 

रवी कुमारने 57 किलो वजनी गटात पहिल्या फेरीत कोरियाच्या किमला 11-0 ने पराभूत केले. दुसऱ्या फेरीत आर्मेनियाच्या अरसेनला 17-6 पराभूत केले.  हे दोन्ही विजय तांत्रिक गुणाधिक्यावर एकतर्फी मिळविले. तिसऱ्या फेरीत जपानच्या टाकताशीला 6-1 असे पराभूत करून त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि याचसह तो ऑलिंपिकसाठीही पात्र ठरला. 

बजरंगीने पहिल्या फेरीत पोलंडच्या बेंकोवस्कीला 9-2 ने पराभूत केले. दुसऱ्या फेरीत स्लोवकियाच्या डेव्हिडला 3-0 ने  पराभूत केले. तिसऱ्या फेरीत कोरियाच्या जॉग सूगला 8-1 ने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि ऑलिंपिकसाठी पात्र ठरला.

WebTitle : marathi news bajarang punia and ravi kumar eligible for Tokyo Olympic

संबंधित बातम्या

Saam TV Live