अटलबिहारी वाजपेयी नाही, बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग!

अटलबिहारी वाजपेयी नाही, बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग!

मुंबई - नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचं नामांतर होण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं या महार्गाचं नामांतर  करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. याची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. या महामार्गाला  दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा भाजपचा  प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मोडीत काढत आता समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्यात येणार आहे. 

शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वक्तव्याचा दाखला देत केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. आपली अर्थव्यवस्था आजारी आहे, हे मोदी सरकार मान्य करायला तयार नाही. त्यामुळे आजार लपवल्यामुळे नायटा झाला आणि खाजवायची चोरी झाली, अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

 56 हजार कोटी रूपये खर्चाच्या आणि मुंबई—नागपूर या शहरांमधील 710 किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांंत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदननिर्बंध, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यमंतील 27  तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे.या प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर होऊन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.

मात्र आता या महामार्गाला बाळासाहेबेंचं नाव देण्याचं सरकारनं ठरवलंय. त्यामुळे त्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. 

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - Balasaheb Thackeray Quick Highway

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com