बाळासाहेब थोरातांनी कोणासाठी केला कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाचा त्याग?

सरकारनामा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

पुणे : कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाचा वाद आगामी काळात पेटण्याची शक्यता आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपण हे पद स्वीकारणार नसल्याचे सांगितल्याने कोल्हापूरचे पालकत्व कोण घेणार, याकडे आता लक्ष आहे.

आमदार विजयकुमार गावित यांची कन्या खासदार तर; आता पत्नी, पुतणी, भावजय झेडपीत https://t.co/AGAtDIn7E6

— MySarkarnama (@MySarkarnama) January 10, 2020

इतर नेत्यांना संधी मिळण्यासाठी मी पालकमंत्री पद घेणार नसल्याची थोरातांची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. मात्र पदासाठी कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यामध्ये चुरस आहे. त्यात मुश्रीफ यांना नगरसारखा तगडा जिल्हा देऊन त्यांच्या ज्येष्ठत्वाप्रमाणे जबाबदारी मिळाली आहे. दुसरीकडे पाटील यांना भंडारा जिल्हा दाखविण्यात आला आहे.

वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर...या नेत्याने केली मध्यस्थी https://t.co/iRpZEUbKMy

— MySarkarnama (@MySarkarnama) January 10, 2020

थोरात यांची ही `त्यागा`ची भूमिका ही सतेज पाटलांसाठी तर पूरक नाही ना, अशी शंका आता राष्ट्रवादी काॅंग्रेसला येत आहे. त्यामुळेच थोरात यांनी हे पद नाकारले तर येथे पाटील यांना संधी मिळू शकते. त्यामुळे बाळासाहेबांचा त्याग हा मुश्रीफ यांना कात्रजचा घाट दाखवू शकतो, अशी शक्यता आहे. 

Web title -  Balasaheb Thorat is not ready to accept gaurdian minister post 

संबंधित बातम्या

Saam TV Live