(video) राहुल गांधींच्या रॅलीजवळ गॅस फुग्यांचा स्फोट

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

देशातल्या 4 राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं जोरात वाहू लागलंय. अन् या निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही कंबर कसून मैदानात उतरले .

मात्र, निवडणुकीच्या या रणसंग्रामात राहुल गांधी थोडक्यात बचावले. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान, गॅसच्या फुग्यांमुळे आगीचा भडका उडाला.

ही घटना राहुल गांधींपासून अवघ्या काहीशा फुटांवर घडली. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कोणालाही झळ पोहोचली नाही.. अन् राहुल गांधीही थोडक्यात बचावले.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आरतीची तयारी केली होती. शास्त्री ब्रिज परिसरात गॅसने भरलेले फुगेही होते. आरतीचं ताट गॅसच्या फुग्यांच्या संपर्कात आल्यामुळे लहानसा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा उठल्या.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live