लॉकडाऊनमध्ये दारु विक्रीवर बंदी कायम , शॉपिंग मॉल वगळता इतर दुकानं सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 एप्रिल 2020

लॉकडाऊनच्या काळात दारुची दुकानं बंदच राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात दारुची दुकानं बंदच राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.राज्याच्या महसुलात वाढ होण्यासाठी सरकारनं वाईन शॉप सुरु करावे अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली होती. याशिवाय आरोग्य मंत्री राजेश टोपेंनीही वाईन शॉप काही नियमांसह सुरु होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली होती. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयानं आता ही सगळी शक्यता संपुष्टात आणलीय. लॉकडाऊनच्या काळात वाईन शॉप सुरु होणार नसल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलंय. त्यामुळं तळीरामांच्या उरल्या सुरल्या आशेवर पाणी फिरलंय.
ग्रामीण भागात शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकानं सुरु होतील. तर शहरी भागात शॉपिंग मॉल, शॉपिंग मार्केट बंद राहतील. मात्र इतर दुकानं सुरु होणार आहे. मात्र यामध्ये कंन्टेंटमेंट झोनचा समावेश असणार नाही. मुंबई, पुणे, मालेगाव, नागपूरसारख्या हॉटस्पॉटच्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंदच राहणार आहेत..याशिवाय ई कॉमर्स साईटवरुन फक्त जीवनावश्यक वस्तूच मागवता येणार आहेत.

दरम्यान, देशभरात काही अटींवर दुकाने उघडण्यास केंद्राने परवानगी दिलीय..यामुळे लाखो दुकानदारांना दिलासा मिळणार आहे... देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीय.. ग्रामीण भागात शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकानांना मुभा देण्यात आलीय.. तर शहरी भागात शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्स वगळता इतर दुकानं सुरू राहतील. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवर लादण्यात आलेली बंदी कायम राहील. तसंच मात्र मुंबई MMR, पुण्यासह कोरोनाचे हॉटस्पॉट असलेली ठिकाणं. आणि रेड झोनमधील भागांना.. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव वगळण्यात आलंय. या मुंबई,नागपूर, पुण्यामध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याने.या परिसरांमध्ये ल़ॉकडाऊनमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणेच, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

यासह केंद्र सरकारने दुकाने उघडण्याची सवलत देताना काही अटी घातल्या आहेत. दुकानात ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतील. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचं आहे, तसेच मास्क आणि हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल, असंही यात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी सर्वसामान्यांनी कोणत्याही दुकानांमध्ये गर्दी करू नये, सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं असं आवाहन साम टीव्हीही तुम्हाला करतंय.

Web Title - MARATHI NEWS Ban on sale of liquor in lockdown maintained


संबंधित बातम्या

Saam TV Live