1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर बँका बंद राहण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

बँकेची कामं असतील तर ती येत्या एक दोन दिवसांमध्ये उरकून घ्या. कारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर बँका बंद राहण्याची शक्यता आहे.

1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर आणि त्यानंतर 8 आणि 9 सप्टेंबरला बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकिंग संबंधीत काही कामं असतील तर ती येत्या दोन दिवसांत करून टाका असेही सांगण्यात येत आहे. 1 सप्टेंबरला अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असते त्यामुळे यादिवशी त्या-त्या राज्यात बँकिंग व्यवहार होणार नाहीत.

त्यानंतर 2 सप्टेंबरला रविवारची सार्वजनिक सुट्टी आहे. 3 सप्टेंबरला जन्माष्टमी आल्याने या दिवशी देखील बँका बंद राहतील. तसेच पेन्शनबाबतच्या मागणीसाठी बँकिंग कर्मचारी 4 आणि 5 सप्टेंबरला संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील कामं होणार नाही. याचा फटका एटीएमला बसू शकतो. कारण बँका बंद असल्याने अनेक एटीएममध्ये नो कॅशचा बोर्ड झळकू शकतो.

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live