भारतात दर 42व्या मिनिटाला एक बँक घोटाळा.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नीरव मोदी आणि विजय माल्ल्य़ांनी बँकांना घातलेली टोपी हा चर्चेचा विषय असला तरी बँकांना गंडा घालणारे हे एक दोघे जण नाहीत. देशभरात नीरव मोदी आणि मल्ल्यासारख्यांची फौजच आहे. इन्स्टिट्यूशनल इनव्हेस्टर ऍडव्हायझरी सर्व्हिसेसच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात बँकांना फसवणारी 12 हजार 533 प्रकरणं उघडकीस आलीयेत. या प्रकरणांमध्ये बँकांचे 18 हजार 170 कोटी रुपये बुडालेत. यातले 2 हजार 810 कोटी पंजाब नॅशनल बँकेचे, बँक ऑफ इंडियाचे 2 हजार 770 कोटी रूपये आणि स्टेट बँकेचे 2 हजार 420 कोटी रुपये बुडालेत. बँकांमधील या घोटाळ्यांमागं अनेक कारणं आहेत.

नीरव मोदी आणि विजय माल्ल्य़ांनी बँकांना घातलेली टोपी हा चर्चेचा विषय असला तरी बँकांना गंडा घालणारे हे एक दोघे जण नाहीत. देशभरात नीरव मोदी आणि मल्ल्यासारख्यांची फौजच आहे. इन्स्टिट्यूशनल इनव्हेस्टर ऍडव्हायझरी सर्व्हिसेसच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात बँकांना फसवणारी 12 हजार 533 प्रकरणं उघडकीस आलीयेत. या प्रकरणांमध्ये बँकांचे 18 हजार 170 कोटी रुपये बुडालेत. यातले 2 हजार 810 कोटी पंजाब नॅशनल बँकेचे, बँक ऑफ इंडियाचे 2 हजार 770 कोटी रूपये आणि स्टेट बँकेचे 2 हजार 420 कोटी रुपये बुडालेत. बँकांमधील या घोटाळ्यांमागं अनेक कारणं आहेत. बँकांमधील अंतर्गत अव्यवस्था, भोंगळ व्यवस्थापन आणि सक्षम ऑडिटअभावी बँकांची फसवणूक केली जातेय.

बँकांची ही अशीच लूट सुरू राहिली तर काही वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना कायमची घरघर लागेल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live