'बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम ऑर्डिनन्स 2019' चा तुमच्यावर काय परिणाम ?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने रोख रकमेबाबत मोठा निर्णय घेतला असून, सरकारने ठेवींबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने ठेवींबाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. गेल्या आठवड्यात याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आपल्याला रोख रकमेची गरज पडल्यास आपण मित्राकडून पैसे घेतल्यास किंवा रोख रक्कम एखाद्याकडून किंवा संस्थेकडून घेतल्यास अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

गेल्या आठवड्यात 'बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम ऑर्डिनन्स 2019' अधिसूचना काढण्यात आली आहे. याचा थेट उद्देश गुंतवणूकदारांची सुरक्षा असणार आहे. पिरॅमिड स्कीम किंवा फसव्या स्कीमच्या जाळ्यात अडकणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 

काही तज्ज्ञांनी याची तुलना नोटाबंदीशी केली असून, याचे एकमेव उद्दिष्ट काळा पैसा रोखणे हे आहे. उत्तर प्रदेशात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी या अधिसूचनेची घोषणा करण्यात आली होती.

या कायद्यानुसार नातेवाईक, बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून तुम्ही ठेवी घेऊ शकता. याचा थेट परिणाम रिअल इस्टेट सेक्टरवर होणार असून, बँक व्यवहारातून करण्यात आलेली रक्कमच गृहित धरण्यात येणार आहे.

Web Title: marathi news banning of unregulated deposits scheme ordinance 2019 and effect on common man 

संबंधित बातम्या

Saam TV Live