मला भारताचा पासपोर्ट मिळाल्यास मला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल : दहशतवादी अफजलगुरुचा मुलगा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 मार्च 2019

बारामुल्ला - जैशेचा दहशतवादी अफजलगुरु याचा मुलगा गालिब गुरु याला आधार कार्ड मिळाले आहे. हे आधारकार्ड मिळाल्याने मी खूश असल्याचे त्याने म्हटले आहे. शिवाय मला भारताचा पासपोर्ट मिळाल्यास मला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल असेही त्याने सांगितले. गालिब गुरू सध्या नीट परीक्षेची तयारी करत असून, त्याला भविष्यात डॉक्टर होण्याची इच्छा आहे.
 
जैशे महंमदचा दहशतवादी अफजलगुरूने संसदेवर हल्ला केला होता. त्याला फाशीची शिक्षा होऊन सहा वर्षं झाली. अफजलगुरुचे कुटुंब श्रीनगरजवळील गुलशनाबाद गावात राहते. 

अफझलला डॉक्टर होण्याची इच्छा होती. शेर-ए-काश्मीर महाविद्यालयातून तो वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत होता. पण हे शिक्षण तो पूर्ण करू शकला नाही. परंतु, मुलगा गालिब याने आपल्याला वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे सांगितले. गालिबला तुर्कस्तानातील मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर होण्याची इच्छा आहे. पण आईने परवानगी दिल्यास भारतातील मेडिकल कॉलेजमध्येही शिक्षण घेण्याची तयारी असल्याचे तो म्हणाला. 

वडिलांसारखे आपण दहशतवादाच्या मार्गाला मात्र जाणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. 'काश्मीरचे स्वातंत्र्य, दहशतवाद या साऱ्यापेक्षा माझी आई मला जास्त महत्त्वाची असल्याचे तो म्हणाला. माझी आई नला नेहमी दहशतवादाच्या मार्गापासून परावृत्त करत आली आहे. ''काश्मीरबद्दल कोणी काही सांगितलं तर ऐकू नकोस, दहशतवादाच्या वाटेवर जाऊ नकोस''असे ती मला नेहमी सांगते असे गालिबने सांगितले.

आजोबा गुलाम मोहम्मद आणि आई तबस्सूम या दोघांनाही गालिबचा अभिमान वाटतो.' गालिबने दहावीत 95 टक्के तर बारावीत 89 टक्के गुण मिळवले. 

Web Title: Proud to own Aadhaar card, want Indian passport next: Afzal

संबंधित बातम्या

Saam TV Live