VIDEO | शेतकऱ्यांचा भिडू, बच्चू कडूंचा बळीराजासाठी आसूड मोर्चा

MARATHI NEWS BCCHU KADU WANTS DECLARE WEIGHT DROUGHT
MARATHI NEWS BCCHU KADU WANTS DECLARE WEIGHT DROUGHT

मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानाने शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा गुरुवारी राजभवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवत बच्चू कडू यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. 

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना राज्यपालांनी भेट नाकारल्याबद्दल शेतकरी नेते राजू शेट्‌टी यांनी तीव्र संताप व्यक्‍त केला. राज्यपाल हे राजकीय पक्षाचे आमदार व नेत्यांना भेटतात; मात्र, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही. राज्यात सरकार नसताना दाद कोणाकडे मागायची? प्रशासकीय अधिकार राज्यपालांकडे आहेत. ते शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत नसतील तर त्यांनी सूत्रे हातात कशाला घ्यायची, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.  शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी राजभवनावर धडक मोर्चाचे आयोजन आज केले होते. हा मोर्चा राजभवनवर जाण्याआधीच अडवला गेला. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. Web Title: Declare wet drought bacchu kadu

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com