BCCI मागवणार मुख्य प्रशिक्षकांसह साहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जुलै 2019

BCCI लवकरच मुख्य प्रशिक्षकांसह साहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर रवी शास्त्री यांनाही पुन्हा अर्ज करावा लागणारेय.

शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा विद्यमान साहाय्यक प्रशिक्षकांमध्ये समावेश आहे.

दरम्यान,  वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी येत्या शुक्रवारी १९ जुलैला भारतीय संघाची निवड केली जाणारेय. मुंबईत यासंदर्भात बैठक पार पडणारेय. यावेळी टीममध्ये मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत आहेत. तर रोहित शर्माकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं अशीही चर्चा आहे. विराटला केवळ कसोटी संघाचा कर्णधार करण्यात येईल असं देखील सांगितलं जातंय. 

WebTitle : marathi news bcci to seek applications for the post of main coach and assistant coach for team india

संबंधित बातम्या

Saam TV Live