"ओला'चालकास 'जय श्रीराम' बोलायला लावून मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जून 2019

ठाणे - 'जय श्रीराम' बोलायला लावून केलेल्या मारहाणीत झारखंडमधील मुस्लिम युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंब्रा येथेही असा प्रकार झाल्याचे उघड झाले. गाडी रस्त्यात उभी केल्याचा जाब विचारताना तिघांनी "ओला'चालकास मारहाण करून त्याला "जय श्रीराम' बोलण्यासाठी धमकावले. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तिघांनाही अटक केली. मुंब्रा-कौसा येथील तन्वरनगर परिसरात राहणारा फैसल उस्मान खान (वय 25) हा "ओला'चालक रविवारी प्रवाशाला घेण्यासाठी दिवा येथील आगासन रोड परिसरात जात असताना त्याची गाडी रस्त्यात बंद पडली.

ठाणे - 'जय श्रीराम' बोलायला लावून केलेल्या मारहाणीत झारखंडमधील मुस्लिम युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंब्रा येथेही असा प्रकार झाल्याचे उघड झाले. गाडी रस्त्यात उभी केल्याचा जाब विचारताना तिघांनी "ओला'चालकास मारहाण करून त्याला "जय श्रीराम' बोलण्यासाठी धमकावले. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तिघांनाही अटक केली. मुंब्रा-कौसा येथील तन्वरनगर परिसरात राहणारा फैसल उस्मान खान (वय 25) हा "ओला'चालक रविवारी प्रवाशाला घेण्यासाठी दिवा येथील आगासन रोड परिसरात जात असताना त्याची गाडी रस्त्यात बंद पडली. त्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या मंगेश मुंढे, अनिल सूर्यवंशी आणि जयदीप मुंढे यांनी फैजलला शिवीगाळ करत रस्त्यात गाडी का उभी केली, अशी विचारणा करत मारहाण केली. नंतर त्याचा मोबाईल घेऊन पळ काढला.

Web Title: Beating Crime
 


संबंधित बातम्या

Saam TV Live