बीडमध्ये पशुसंवर्धन विभागाचे 'गुजरात कनेक्शन'; त्या स्टिकरमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पशुवैद्यकीय रुग्णालयांत पुरवठा केलेल्या सुयांच्या बॉक्सवरील किमतीचे स्टिकर काढताच "फॉर द यूज ऑफ गव्हर्न्मेंट ऑफ गुजरात-नॉट फॉर सेल' या ठळक मजकुराने खरेदीचे पितळ उघडे पाडले आहे.

पशुवैद्यकीय रुग्णालयांत पुरवठा केलेल्या सुयांच्या बॉक्सवरील किमतीचे स्टिकर काढताच "फॉर द यूज ऑफ गव्हर्न्मेंट ऑफ गुजरात-नॉट फॉर सेल' या ठळक मजकुराने खरेदीचे पितळ उघडे पाडले आहे.

रुग्णालय आणि तालुका स्तरावरून खरेदी झाली असली तरी ठराविक एजन्सीकडून पुरवठा, त्याच एजन्सीकडून खरेदीसाठी वरिष्ठ स्तरावरुरून केलेली सक्ती, मार्चमध्ये जनावरांच्या लसीकरणासाठी सुयांच्या गरजेसाठी खरेदीची गरज दाखवून एप्रिल-मे महिन्यांत पुरवठा करून जुन्या तारखेंचे देयक, काही अधिकाऱ्यांनी चक्क खरेदीचे धनादेश स्वत:च्या नावे उचलणे या आणि अशा अनेक संशयास्पद बाबी या खरेदीत घडल्या आहेत. पशुपालकांकडून सेवाशुल्कापोटी जमा झालेली रक्कम खरेदीच्या नावाखाली हडप करणारी साखळीच असल्याचा संशय व्यक्त होतोय.

गुजरात सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला मोफत पुरवठा करावयाच्या सुयांच्या बॉक्सला किमतीचे स्टिकर लाऊन हा सर्व गोलमाल झाला नाही ना, असाही संशय आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live