माझ्यावर भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत - धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 जानेवारी 2019

बीड- मी सुखरुप आहे, हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

मुंडे म्हणाले, “मी बीड येथील गहिनीनाथगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे. हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, “कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. माझ्यावर भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत.” मी बीड येथील भगवानगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे.

हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, असे मुंडे यांनी ट्विट करून सांगितले आहे.

दरम्यान, श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे आज प.पू. वै. वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंडे यांनी पूजा  केली. सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ह. भ.प. विठ्ठल महाराजांचे आशीर्वाद घेतले, भक्तांशी संवाद साधला. मागील 15 वर्षांपासून ही पूजा ते नियमाने करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: I have the blessings of God and goodwill of the people - Dhananjay Munde

संबंधित बातम्या

Saam TV Live