परळीत नाथ फेस्टिव्हलमध्ये सपना चौधरीचे अश्लील ठुमके, धिंगाणा घालणाऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांची लाठीचार्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

आपल्याकडे दिवसेंदिवस उत्सवांचं रूप किती विभित्स होत चाललंय याची प्रचिती आता गणेशोत्सवातही दिसून येतेय. लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांचं प्रबोधन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या गणेशोत्सवाचा आता बाजार झालाय की काय असा सवाल उपस्थित केला जातोय.

हरियाणातील प्रसिद्ध डांसर सपना चौधरी हिने परळीच्या नाथ फेस्टिव्हल मध्ये हजेरी लावली. धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात आत्ता पर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यातलीच एक म्हणजे ही सपना चौधरी.

मात्र,  तिनं या कार्यक्रमात जो डान्स केलाय तो कोणत्या पद्धतीचा आहे, या उत्सवात हा नृत्यप्रकार शोभतो का. जो धिंगाणा घालण्यात आलाय त्याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उभे राहतायत.

तिच्या नृत्यावर बेभान झालेल्या तरुणांना आवरण्यासाठी इथं पोलिसांना लाठीचार्जही करावा लागल्याचं समजतंय... स्वत: धनंजय मुंडेंनाही या तरुणांना आवरण्यासाठी मैदानात उतरावं लागलं.

त्यामुळे एकीकडे गणेशोत्सव साजरा करताना दुसरीकडे आपल्या उत्सवांचा बाजार तर होत नाहीये ना?,  असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live