बीडमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

बीड : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी (ता. २५) पहाटेच्या दरम्यान घडल्या. शिवराम पाराजी जाधव (वय ६२, रा. वांगी, ता. बीड) व पांडुरंग भानुदास घोडके (वय ५०, रा. लोळदगाव, ता. बीड) अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

शिवराम जाधव यांच्याकडे सरकारी बॅंकेचे कर्ज असून, यंदा झालेल्या नापिकीमुळे ते कर्ज फेडण्याच्या चिंतेत होते. यामुळे त्यांनी गुरुवारी (ता. २४) विषप्राशन केले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. तर, पांडुरंग घोडके यांनीही याच कारणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. 

Web Title: Two farmers' suicides due to the worrying of lending and  napikis

संबंधित बातम्या

Saam TV Live