Loksabha2019 : कमळाबाईचे काही खरं हाय का'? धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 एप्रिल 2019

केज (बीड) : 'कसं काय शेलार बरं हाय का? कमळाबाईचे काही खरं हाय का'? विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी उपरोधात्मक कविता त्यांच्या ट्विटरवरून पोस्ट करत भाजपवर चांगलीच टिका केली. काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपने आयात केलेले उमेदवार, नगर  मधील विखे पाटील आणि मोहिते पाटील या बड्या काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मुलांना भाजप मध्ये दिला गेलेला प्रवेश या सगळ्यांवर या कवितेमध्ये टिका करण्यात आली आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे-राष्ट्रवादीवर टिका करताना शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरं. असे ट्विट केले होते. यावरून मुंडे यांनी शेलार यांना अनेकदा टोला लगावला होता. आजच्या ट्विटमध्येही त्यांनी असाच टोला शेलार यांना लगावला आहे. 
 
राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना उद्देशून या कवीतेमध्ये मुंडे म्हणतात, आमच्या पक्षातून विझवलेल्या दिव्यांना घेऊन तुम्हाला त्याचा काही उपयोग आहे का? बीड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावने यांच्या प्रचार्था धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभा सुरु आहेत. आज दिवसभर नांदुरघाट, विडा, रायमोहा आदी ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा झाल्या. यातून वेळ काढत मुंडे यांनी ही कविता त्यांच्या ट्विटरवून पोस्ट केली आहे.  

कसं काय शेलार बरं हाय का?
कमळाबाईचे काही खरं हाय का?

काल म्हणे तुमची हद्दच झाली
सत्तेसाठी आमची पक्षफोडी केली

वागणं तुमचं हाय रं गैर
आता तुमची नाय रं खैर

नेहमीच तुम्ही
खेळतात कावे
काय हाय उपयोग
घेऊन विझलेले दिवे?
तुमच्या घरात त्याचा
उजेड पडल काय?
कमळाबाईचे काही खरं हाय का?

कसं काय शेलार बरं हाय का?
कमळाबाईचे काही खरं हाय का?

काल म्हणे तुमची हद्दच झाली
सत्तेसाठी आमची पक्षफोडी केली

वागणं तुमचं हाय रं गैर
ता तुमची नाय रं खैर
नेहमीच तुम्ही खेळतात कावे
य हाय उपयोग घेऊन विझलेले दिवे?
तुमच्या घरात त्याचा उजेड पडल काय?
कमळाबाईचे काही खरं हाय का?

Web Title: Dhananjay Munde criticize for BJP in poem form

संबंधित बातम्या

Saam TV Live