लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचे तीनतेरा..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 जून 2019

लोकल प्रवास आशा पाटील यांच्या जीवावर बेतला होता. नशिब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचलाय. रात्री 9 ची वेळ  होती. डोंबिवली जाण्यासाठी त्यांनी  ठाण्याहून लोकल पकडली. लोकलमध्ये गर्दी असल्याने त्या दरवाजाच्या आतल्या बाजूला उभ्या होत्या. लोकल ठाणे आणि कळवा खाडी पुलाजवळ पोहचली होती इतक्यात अचानक रिकामी दारूची बाटली त्यांच्या हातावर आदळली. त्यांच्या हाताला आणि डोक्याला जबर दुखापत झालीय.

बाटली फेकल्याचा प्रकार घडल्यानंतर नेहमीप्रमाण रेल्वे पोलिस कामाला लागलेत. आता त्यांनी आरोपीची शोधशोध सुरु केलीय. मात्र, या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. 

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये महिलांची छेडछाड आणि चोरीचे प्रकार वाढलेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असलेला प्रवाशांच्या सुरक्षेचा दावा फोल ठरलेला दिसून येतो
 
संबंधित बातम्या

Saam TV Live