बिअर पिण्यासाठी त्यानं घरात बसवली पाईपलाईन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

बिअर हे मद्यप्रेमींचं आवडतं पेय आहे. कुणी बिअर पिण्यासाठी हॉटेलात जातं तर कुणी आपल्या मित्रांसोबत शांत ठिकाणी बसून बिअर पिणं पसंत करतं. पण रशियातला हा अँड्री इरेमीव सगळ्यांपेक्षा वेगळा ठरलाय. दुकानात जाऊन रोज बिअर आणायचा कंटाळा येत असल्यानं अँड्रीनं चक्क घरातच बिअरचा नळ बसवून घेतलाय. 

अँड्री बियरप्रेमी असल्यानं त्यानं खास बिअरचं दुकान असलेल्या अपार्टमेंटमध्येच घर घेतलं. घरात बसून बिअर पिण्याची कल्पना त्यानं दुकान मालकाला सांगितली. मग काय आपल्यालाही चार पैसे मिळणार असल्यानं दुकान मालकानं लागलीच होकार दिला. आणि लागलीच अँड्री तयारीला लागला. अर्थात घरात बिअरचा नळ बसवणं अँड्रीसाठी तितकं सोप्पं नव्हतं. यासाठी त्याला खुप सारा खटाटोप करावा लागला. बिल्डिंगमधल्या सदस्यांची परवानगी घेण्यासोबत त्याला तिथल्या स्थानिक प्रशासनाकडूनही ना हरकत दाखला घ्यावा लागला. सगळ्या कायदेशीर बाबीही पूर्ण पार पाडल्यानंतर अँड्रीचं स्वप्न साकार झालं.

आता अँड्रीचं अनुकरण इतर लोकही करू लागलेत. त्यामुळे काही दिवसात रशियात असे घराघरात बिअरच्या पाईपलाईन दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको
 
संबंधित बातम्या

Saam TV Live