महाराष्ट्र सरकारकडून पाण्याच्या मोबदल्यात पाण्याची मागणी : मंत्री शिवकुमार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 मे 2019

बेळगाव - दरवर्षी उन्हाळयात पाण्याची गरज भासल्यानंतर महाराष्ट्र सरकार कर्नाटकाला पाणी सोडते. त्यामोबदल्यात पैसे दिले जातात. पहिल्यांदा पाण्याच्या मोबदल्यात पाण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. शिवाय कायस्वरुपाची करार करण्याचा प्रस्ताव आहे. यावर निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचा अभ्यास अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पाटंबधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. 

क्‍लब रोड येथे पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात आज (ता.6) खासदार, आमदार, अधिकारी यांची शिवकुमार यांनी बैठक घेतली. त्यानंतर शिवकुमार बोलत होते.

श्री. शिवकुमार म्हणाले,""महाराष्ट्र कोयना धरणातून दुष्काळात पाणी सोडते. पाण्याच्या मोबदल्यात पैसे दिले जातात. पहिल्यांदा पाण्याच्या मोबदल्यात पाण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र कृष्णा नदीला कोयना, राजापूर धरणातून पाणी सोडते. त्यामोबदल्यात महाराष्ट्रामधील काही भागात पाणी सोडण्याची मागणी आहे. नेमक्‍या कोणत्या भागात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. याचा तपशिल आताच उघड केला जाणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय घेतला जाईल. म्हणजे 29 मेनंतर निर्णय होईल. त्यापूर्वी तांत्रिक समिती स्थापना करण्यात येत आहे. समितीच्या अहवालावर अभ्यास झाल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईल.'' 

शिवकुमार म्हणाले,""महाराष्ट्राने चार टीएमसी पाण्यासासाठी कराराचा प्रस्ताव दिला आहे. शिवाय तेवढ्या पाण्याची मागणीही केली आहे. दोन टीएमसी पाणी खरीप, दोन टीएमसी रब्बी हंगामात उपलब्ध करून देण्याचा उल्लेख आहे. त्याचा सर्वंकष अभ्यास होणे जरुरी आहे. भविष्यासाठी कायम स्वरुपी निर्णय आहे. करारावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी व्यापक चर्चा करण्याची गरज आहे. मंत्रीमंडळापुढे विषय ठेवला जाईल.'' 

कर्नाटकात 150 तालुक्‍यात दुष्काळ 
कर्नाटकात 150 तालुक्‍यात दुष्काळ आहे. पैकी कृष्णा काठावर भीषण पाणी समस्या आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. फोनवरून बोलणे झाले आहे. त्यांनी एक टीएमसी पाणी तातडीने सोडण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच पाणी करारबाबत मंत्री आणि आमदारांशी चर्चा झाली आहे. चांगला सल्ला, माहिती दिली आहे. अंतिम निर्णय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता झाल्यानंतर घेऊ, असे मंत्री शिवकुमार यांनी सांगितले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, विधान परिषद विरोधपक्ष नेते एस. आर. पाटील, खासदार प्रभाकर कोरे, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी, शिवनंद कौजलगी उपस्थित होते. 

Web Title: water demand by Maharashtra to Karnataka In exchange for water

संबंधित बातम्या

Saam TV Live