माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना देशाऐवजी निवडणुकीची चिंता

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मार्च 2019

बेळगाव - सर्वांना देशाची चिंता लागली आहे. पण, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना लोकसभा निवडणुकीतील जागांची चिंता आहे, असा टोमणा नगरविकास मंत्री यू. टी. खादर यांनी लगावला.

बेळगाव - सर्वांना देशाची चिंता लागली आहे. पण, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना लोकसभा निवडणुकीतील जागांची चिंता आहे, असा टोमणा नगरविकास मंत्री यू. टी. खादर यांनी लगावला.

स्मार्ट सिटी योजनेखाली टिळकवाडी, नाथ पै सर्कलमध्ये सोमवारी (ता. ४) आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री खादर म्हणाले, ‘‘देशातील कर्तव्यदक्ष सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले आहे. ४० जवान हुतात्मा झाले. पुलवामामधील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हवाई दलाच्या जवानांनी एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानच्या बालाकोटातील दहशतवाद्यांचा खात्मा केला. देशातील जनतेला देशाची चिंता आहे. दुर्दैवाने माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना लोकसभा निवडणुकीतील जागांची चिंता आहे. एअर स्ट्राईकमुळे पक्षाच्या जागा वाढतील, असा अजब तर्क येडियुराप्पा यांनी लढविला आहे. या विषयात राजकारणाचा शिरकाव कितपत योग्य?’’

खादर पुढे म्हणाले, ‘‘देशामध्ये विविधतेत एकता आहे. देशावर संकट ओढविल्यानंतर राजकारण करू नये. पण, काही जण जबाबदारी स्थानावर असताना राजकारण करत आहेत. देशासाठी या गोष्टी शोभत नाही. निवडणुकीपेक्षा मातृभूमी महत्त्वाची. दुर्दैवाने याचा विसर येडियुराप्पांना पडल्याचे जाणवते. एअर स्ट्राईकसंदर्भात देशातील जनतेत संभ्रम आहे. त्याचा खुलासा करावा. देशविरोधी घोषणांचा निषेध करतो. प्रत्येकाने निषेध करावा. आपण भारतीय आहोत. त्याचा गौरव, अभिमान बाळगावा.’’

Web Title: Minister U T Khadar comment


संबंधित बातम्या

Saam TV Live