'राज्यात राजकीय बदल होणे आवश्‍यक आहे आणि युतीच्या कचाट्यातून सुटका व्हावी' : येडियुराप्पा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मे 2019

बंगळूर : कुंदगोळ व चिंचोळी पोटनिवडणुकीत भाजप विजयी झाल्यास राज्यात राजकीय उलथापालथ अटळ आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी केला आहे. ते गुरुवारी (ता. 19) हुबळीत पत्रकारांशी बोलत होते.

बंगळूर : कुंदगोळ व चिंचोळी पोटनिवडणुकीत भाजप विजयी झाल्यास राज्यात राजकीय उलथापालथ अटळ आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी केला आहे. ते गुरुवारी (ता. 19) हुबळीत पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, "राज्यात राजकीय बदल होणे आवश्‍यक आहे. युतीतील वादांमुळे राज्याचा विकास खुंटला आहे. युतीच्या कचाट्यातून सुटका व्हावी, अशी जनतेची इच्छा आहे. युतीतील वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर त्यात भर पडण्याची शक्‍यता आहे. युती सरकारचे पतन करण्याचा कट आम्ही रचलेला नाही. धजद आमदार किंवा नेते आपल्या संपर्कात नाहीत. आम्ही विरोधी पक्षात राहून काम करण्यास तयार आहोत. पण, युतीतील वादच सरकारचे पतन करतील.''

वीरशैव लिंगायत समाजाची मते मागण्याचा नैतिक हक्क कॉंग्रेस पक्षाला नाही. सिध्दरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खालच्या पातळीवर केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. सिध्दरामय्यांचे समर्थक वारंवार भांडणे करीत आहेत. आपापसातील भांडणातूनच सरकारचे पतन होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री करायला हवे, या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : 'Political change in the state is necessary and get rid of allies': Yeddyurappa


संबंधित बातम्या

Saam TV Live