काँग्रेसमधील ८ आमदारांच्या गुप्त हालचालींना आला वेग

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 जानेवारी 2019

बंगळूर - काँग्रेसच्या ८ असंतुष्ट आमदारांच्या गुप्त हालचालींना पुन्हा जोर आला आहे. त्यामुळे राज्यातील युती सरकारवर अनिश्‍चिततेचे सावट नव्याने आले आहे. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील युती सरकाराचे पतन करण्यासाठी कोणताही त्याग करण्यास सिद्ध असल्याचे आश्वासन असंतुष्ट आमदारांनी भाजपला दिल्याचे समजते.

बंगळूर - काँग्रेसच्या ८ असंतुष्ट आमदारांच्या गुप्त हालचालींना पुन्हा जोर आला आहे. त्यामुळे राज्यातील युती सरकारवर अनिश्‍चिततेचे सावट नव्याने आले आहे. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील युती सरकाराचे पतन करण्यासाठी कोणताही त्याग करण्यास सिद्ध असल्याचे आश्वासन असंतुष्ट आमदारांनी भाजपला दिल्याचे समजते.

असंतुष्टांनी आमदारपदाचा रजीनामा दिल्यास, तातडीने सदर मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी, लोकसभा निवडणुकीबरोबर पोटनिवडणूक घेतल्यास बरे होईल. ते शक्‍य न झाल्यास महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबरोबर पोटनिवडणूक घ्यावी, अशा आमच्या मागण्या मान्य केल्यास सरकारचे पतन करण्यास किंवा अविश्वास ठरावावर क्रॉस मतदान करण्यास तयार आहेत, असे रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील असंतुष्टांच्या गटाने बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह भाजप हायकमांडना सांगितल्याचे समजते. आमच्या मागण्या मान्य झाल्यास फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळातच युती सरकारचे पतन करण्यात येईल, अशी ग्वाहीही दिल्याचे वृत्त आहे.

पक्षांतर बंदी कायद्यामुळे आपण अडचणीत येणार नाही, याची खात्री करून घेण्याठी ८ असंतुष्ट आमदार सर्वोच्च न्यायालयाचे अँड.  हरिश साळवे यांचा सल्ला घेण्याच्या विचारात आहेत. असंतुष्ट आमदार काही दिवस मुंबईतच मुक्काम ठोकून आहेत. तेथूनच काँग्रेसच्या काही आमदारांशी संपर्क साधून आपल्या गटाची संख्या वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आता भाजप नेत्यांच्या आश्वासनावर असंतुष्ट आमदारांच्या पुढील हालचाली अवलंबून आहेत.

मुख्यमंत्री कुमारस्वामी ८ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र भाजप व असंतुष्टांच्या  या हालचालीमुळे ते अर्थसंकल्प मांडणार की त्यापूर्वीच सरकार कोसळणार याबाबत साशंकता आहे.

येडियुराप्पांची बैठक
काँग्रेस व धजद युतीमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली. बैठकीला व्ही. सोमण्णा, आर अशोक, अरविंद लिंबावळी, रविकुमार आदी नेते उपस्थित होते. काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांच्या हालचाली, काँग्रेस व धजद मित्र पक्षातील मतभेद, बजेट अधिवेशन यावर चर्चा झाल्याचे समजते.

काँग्रेसचे डावपेच
भाजपच्या तंत्राला प्रतितंत्र आखण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. भाजपच्या छावणीत गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी काँग्रेसनेही डावपेच सुरू केले आहेत. काँग्रेस विधीमडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या चार आमदारांना परत आणण्यासाठी सिध्दरामय्या यांच्यासमोर हजर होण्यासंदर्भात नोटीस देण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. 

आमदार रमेश जारकीहोळी कोठे आहेत, हे मला माहीत नाही. ते गोकाकमध्ये नाहीत. माझ्या संपर्कातही आले नाहीत. ते माझे भाऊ असले तरी आमचे व्यवहार वेगवेगळे आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेत्यांना ते येऊन भेटण्याची शक्‍यता आहे. १७ जानेवारीला रमेश यांना भेटण्यासाठी सिद्धरामय्या बेळगावला आले होते, परंतु बेळगावला आलेच नाहीत. त्यांना फोन केला होता, परंतु त्यांनी फोन स्वीकारला नाही.
- सतीश जारकीहोळी

मंत्री व रमेश यांचे भाऊ

Web Title: The secret movements of eight Congress MLA came to an end, uncertainty surrounding the alliance government in state

 


संबंधित बातम्या

Saam TV Live