बेस्टचं 15 कोटी रुपयांचं नुकसान 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 जानेवारी 2019

बेस्टच्या संपाचा आजचा आठवा दिवस आहे. आठ दिवस उलटले तरीही बेस्टच्या संपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनांचं तब्बल 15 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. 

गेल्या आठ दिवसांपासूनही या संपावर तोडगा न निघाल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल होतायत. एसटीकडून आणि खाजगी बस चालकांकडून सेवा पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर रिक्षा, टॅक्सीवाल्यांकडून प्रवाशांची लूट सुरूच आहे. बेस्टचा हा संप इतिहासातला सर्वाधिक काळ चाललेला संप ठरलाय. 

दरम्यान, मराठी माणसाच्या गरजेला धावणाऱ्य़ा बेस्ट बसच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आलाय, असा आरोप केला जात आहे. मराठी माणसासाठी सामटीव्ही स्पेशल मोहिम राबवते आहे. मध्यमवर्गीय बेस्ट कर्मचाऱ्यांचे संसार वाचवण्यासाठी बेस्टच्या संपाची प्रत्येक बित्तंबातमी, बेस्ट संपाचे प्रत्येक अपडेट्स आपण घेत राहणार आहोत.
 
WebTitle : marathi news best strike costs worth fifteen crore of revenue 

संबंधित बातम्या

Saam TV Live