बेस्टची उद्या बंदची हाक... 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

बेस्टनं उद्या बंदची हाक दिली आहे. बेस्टचं खाजगीकरण होत असल्याचा निषेध म्हणून बंद पुकारण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. 450 बस आणि कामगार भाड्यानं घेण्याचा निर्णय बेस्ट समितीनं घेतलाय. या निर्णयाला बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीनं विरोध केलाय. हा निर्णय म्हणजे बेस्ट च्या खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप संयुक्त समितीचे प्रमुख शशांक राव यांनी केलाय. याविरोधात त्यांनी 15 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या बंद ची हाक दिलीय. दरम्यान बेस्टने संप केल्यास त्याचा सर्वसामान्य मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यताय.

बेस्टनं उद्या बंदची हाक दिली आहे. बेस्टचं खाजगीकरण होत असल्याचा निषेध म्हणून बंद पुकारण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. 450 बस आणि कामगार भाड्यानं घेण्याचा निर्णय बेस्ट समितीनं घेतलाय. या निर्णयाला बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीनं विरोध केलाय. हा निर्णय म्हणजे बेस्ट च्या खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप संयुक्त समितीचे प्रमुख शशांक राव यांनी केलाय. याविरोधात त्यांनी 15 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या बंद ची हाक दिलीय. दरम्यान बेस्टने संप केल्यास त्याचा सर्वसामान्य मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यताय. दुसरीकडे बेस्ट उपक्रमासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून घेण्यास असमर्थ ठरलेल्या सत्ताधारी शिवसेनेने ४५० बसगाड्या भाड्याने घेण्याच्या प्रस्तावास मान तुकवलीये. यामुळे बेस्ट कामगार कृती समितीने १५ फेब्रुवारीला पुकारलेल्या संपात सामील होण्यास बेस्ट कामगार सेनेच्या नेत्यांनी नकार दिलाय. परिणामी, कृती समितीमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live