भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 मे 2018

भंडारा: मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे 40 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. आज (गुरुवार) मतमोजणी सुरू झाल्यानंतर अटीतटीची लढत पहायला मिळाली. अखेर मधुकर कुकडे यांनीच बाजी मारली.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पोटनिवडणूक झाली होती. भंडारा-गोंदियामध्ये तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात मुख्य लढत होती. मतमोजणी सुरू असताना सतत आकडे बदलताना दिसत होते. यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता लागली होती.

दरम्यान, भंडारा-गोंदिया मतदारसंघात बुधवारी पुन्हा 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर जवळपास 40 हजार मतदार होते. त्यापैकी जवळपास 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाच्या दिवशीही अनेक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही निवडणूक मतदान यंत्रांमुळेच जास्त गाजली होती.

संबंधित बातम्या

Saam TV Live