भारत बंदला देशभरात अनेक ठिकाणी हिंसक वळण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 एप्रिल 2018

एट्रोसिटी कायद्यासाठी दलित संघटनांकडून सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आलीय. दलित संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या या भारत बंदला देशभरात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलंय. यूपीच्या मुझफ्फरनगर इथं अनेक गाड्यांना जाळण्यात आल्यात. पुलाखाली उभ्या असलेल्या या गाड्या आंदोलकांनी पेटवून दिल्यात. दलित संघनांकडून देशात आज भारत बंदची हाक देण्यात आलीय. या बंदला हिंसक वळण लागलंय... उत्तर भारत पेटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लुधियाना, रांची, आग्रा, जयपर, रायपूर, लखनौ, पाटणा या सर्वच शहरांमध्ये जाळपोळ, गाड्यांची तोडफोड, दगडफेकीच्या घटना घडल्यात.

भारत बंदला गालबोट
देशभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला, दगडफेक जाळपोळही झालीय. अनेक भागात पोलिसांकडूनही बळाचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे दलित संघटनांच्या या भारत बंदला गालबोट लागलंय.. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचारप्रतिबंधक कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागतोय. त्यामुळे केंद्र सरकारनं सोमवारीच सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केलीय.

बंद दरम्यान गोळीबार
मध्य प्रदेशच्या ग्वालीयर मध्ये भारत बंद दरम्यान चक्क गोळ्या झाडण्यात आल्या. आंदोलकांमधील एका व्यक्तीनं बंदूक काढून पोलिसांच्या दिशेनं गोळ्या झाडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live