भेंडवळची पाऊसमानाची भविष्यवाणी जाहीर.. काय आहे यंदाचं भेंडवळचं भाकीत ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 एप्रिल 2018

बुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. या भेंडवळीत नैसर्गिक प्रतिकांची घटमांडणी करुन देशाच्या आर्थिक आणि सर्व प्रकारच्या स्थितीविषयी भाष्य करण्यात आलं. यंदा पाऊस सर्वसाधारण असल्याचे भाकीत सांगण्यात आले आहे. मात्र, भाकितामध्ये शेतकरी मंदीच्या फेऱ्यात अडकणार असल्याचे म्हटलंय. पाऊस यंदा चांगला होईल, दुष्काळ नसेल असं सांगत शेतकरी आणि राज्यातील नागरिकांना दिलासा देणारे भाकीतही भेंडवळीच्या घटमांडणीत वर्तवण्यात आले आहे.

बुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. या भेंडवळीत नैसर्गिक प्रतिकांची घटमांडणी करुन देशाच्या आर्थिक आणि सर्व प्रकारच्या स्थितीविषयी भाष्य करण्यात आलं. यंदा पाऊस सर्वसाधारण असल्याचे भाकीत सांगण्यात आले आहे. मात्र, भाकितामध्ये शेतकरी मंदीच्या फेऱ्यात अडकणार असल्याचे म्हटलंय. पाऊस यंदा चांगला होईल, दुष्काळ नसेल असं सांगत शेतकरी आणि राज्यातील नागरिकांना दिलासा देणारे भाकीतही भेंडवळीच्या घटमांडणीत वर्तवण्यात आले आहे. जूनमध्ये पाऊस कमी असेल जुलै महिन्यात पाऊस खऱ्या अर्थाने जोर धरेल,असे सांगण्यात आले असून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात चांगला पाऊस होईल, असं भाकीतही वर्तवण्यात आले आहे. जून महिन्यामध्ये पेरणी कमी असेल हळूहळू ती वाढत जाईल. राज्याच्या सर्वदूर भागात सर्वसाधारण पाऊस असेल दुष्काळाचं राज्यावर सावट नसेल असे भाकीत वर्तवण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. यापूर्वी हवामान खात्यानेही चांगला पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज वर्तवला होता.


संबंधित बातम्या

Saam TV Live