भिडे गुरुजींना चिपळूणात सभास्थळापासून का काढावे लागले चपळाईने बाहेर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

संभाजी भिडेंच्या बैठकीस तीव्र विरोध झाला तरी सव्वा तीन तास बैठक रंगली. सभास्थळी दोन्ही मार्गावर विरोधकांनी ठाण मांडल्याने भिडेंना सुखरूप बाहेर काढण्यास पेच निर्माण झाला होता. अखेर रेल्वेस्थानक मार्गावरील आंदोलकांना बाजूला करून भिडे गुरुजींना सभास्थळापासून बाहेर काढण्यात आले. 

संभाजी भिडेंच्या बैठकीस तीव्र विरोध झाला तरी सव्वा तीन तास बैठक रंगली. सभास्थळी दोन्ही मार्गावर विरोधकांनी ठाण मांडल्याने भिडेंना सुखरूप बाहेर काढण्यास पेच निर्माण झाला होता. अखेर रेल्वेस्थानक मार्गावरील आंदोलकांना बाजूला करून भिडे गुरुजींना सभास्थळापासून बाहेर काढण्यात आले. 

चितळे मंगल कार्यालयात बैठक सुरू असताना विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची  घोषणाबाजी सुरू होती. अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, तहसीलदार जीवन देसाई हे  आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. मात्र संतापलेले आंदोलक प्रतिसाद देत नव्हते. दरम्यान, रात्री 9 च्या सुमारास बैठक संपल्यानंतर भिडे गुरुजींना सुखरूप बाहेर कसे बाहेर काढण्याचा प्रशासनासमोर प्रश्‍न होता.

यावेळी बेंदरकर आळीतील दोन्ही मार्गावर जोरदार घोषणाबाजी सुरू होती. बैठक संपल्यांवर चपळाईने भिडे गुरुजींना बाहेर काढण्यात आले. दहा ते 15 मिनिटे भिडे गुरुजी गाडीत बसून होते. बेंदरकर आळीतून रेल्वेस्थानक मार्गावरील आंदोलकांना पोलिसांनी बाजूला करण्यास सुरवात झाली. यावेळी पोलिस प्रशासन आणि तहसीलदार तणावाखाली होते.

लाठी चार्ज करण्याची तयारी झाली होती. त्यासाठी एस. आर. पी. एफच्या जवांनानी दोन तीन वेळा रस्त्यावरून संचलन केले. यामुळे आंदोलकांवरही दबाव वाढला होता. अखेर रेल्वेस्थानक मार्गावरील लोकांना बाजूला करून गुरुजींची गाडी बाहेर काढण्यात आली. गाडी बाहेर पडल्यावर नवा भैरीजवळील आंदोलक अधिक आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिसांसह भिडेंविरोधी प्रचंड घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र हायस्कूल ते स्वामी मठ मार्गावरून त्यांना पोलिसांच्या फौजफाट्यात चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटापर्यंत सोडण्यात आले. भिडेंसोबत सांगली येथील पोलिस पथक देखील आले होते. बुधवारी रात्री 10. 40 वाजता गुरुजींनी कुंभार्ली घाट सोडला. गुहागर, खेड, संगमेश्‍वर, रत्नागिरी येथील धारकरी सदस्य बैठकीस आले होते. रात्री 10 नंतर ते खासगी वाहनांनी सुखरूप परतले. गुरुजी गेल्यानंतर आंदोलनकर्ते रात्री पुन्हा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर जमले होते. तेथे घोषणा दिल्यानंतर घरी परतले. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live