VIDEO | भीमा-कोरेगावचं संपूर्ण प्रकरण...

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 29 जानेवारी 2020

ज्या कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास NIAमार्फत केला जाणारंय... ते प्रकरण नेमकं काय आहे ?

1 जानेवारी 2018  हाच तो दिवस...ज्यादिवशी कोरेगाव-भीमाच्या रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विजय दिवस साजरा केला जात होता. वढू बुद्रुक इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेनं आंबेडकरी अनुयायी येत होते. सणसवाडीजवळ दोन्ही गटांमध्ये किरकोळ वाद झाला आणि दोन्ही गट आपसात भिडले. 

किरकोळ बाचाबाचीतून सुरू झालेला वाद वाढत गेला आणि त्याचं पर्यावसन दगडफेक आणि जाळपोळीत झालं. या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले. 

या घटनेचे पडसाद नंतर राज्यभरात उमटले होते. त्या घटनेच्या निषेधार्थ 3 जानेवारी 2018 रोजी राज्यव्यापी बंद पुकरण्यात आला होता. त्या बंदकाळात मोठा हिंसाचार झाला होता. 

या घटनेनंतर 17 ऍट्रोसिटीज आणि 600हून अधिक गुन्हे दाखल झाले होते. तर 1 हजार 199 जणांवर अटकेची कारवाई तर 2 हजार 53 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. बंदकाळात सुमारे 13 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.

फायनल व्हीओ - कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर एल्गार परिषदेच्या नेत्यांसोबत संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर जमावाला चिथवण्याचे आरोप लावण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी नेमण्याची मागणी होती. मात्र त्यापूर्वीच केंद्रानं हा तपास NIAकडे सोपवलाय. त्यामुळे आता NIAच्या तपासात कोणत्या नव्या पैलूंचा उलगडा होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. 

WEB TITLE -  BHIMA KOREGAON FULL MATTER OF THAT DAY 

संबंधित बातम्या

Saam TV Live