भिवंडीत केमिकल्सचा साठा असलेल्या गोडाऊनला भीषण आग

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड इथं वेदांता ग्लोबल गोडावूनला भीषण आग लागलीय.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गोडावूनमध्ये केमिकल्सचा साठा होता...त्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.

आगीच्या धुराचा स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होत आहे...गेल्या 4 तासांपासून ही आग धुमसतीय. आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे, कल्याण डोंबिवली आणि भिवंडी महापालिका अग्ऩिशमन दलाच्या 7 गाड्या आणि 5 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झालेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातायेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live