"बॉक्सर मोदींनी आपल्या प्रशिक्षकाला पंच मारले" - राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 मे 2019

भिवानी (हरियाना) : बेरोजगारीशी लढण्यासाठी "बॉक्‍सर' मोदी रिंगमध्ये उतरले; पण अखेर त्यांनी आपल्या प्रशिक्षकालाच (अडवानी) पंच मारले, असा टोला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मारला. 

भिवानी (हरियाना) : बेरोजगारीशी लढण्यासाठी "बॉक्‍सर' मोदी रिंगमध्ये उतरले; पण अखेर त्यांनी आपल्या प्रशिक्षकालाच (अडवानी) पंच मारले, असा टोला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मारला. 

मुष्टीयोद्‌ध्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवानी येथील सभेत राहुल यांनी तोच संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. "छप्पन इंच छाती असल्याचा दावा करणारे बॉक्‍सर मोदी हे शेतकरी प्रश्‍न, बेरोजगारी, भ्रष्टाचार या प्रश्‍नांचा मुकाबला करण्यासाठी रिंगमध्ये उतरल्याचे सांगत होते. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांचे प्रशिक्षक लालकृष्ण अडवानीही उपस्थित होते.

रिंगमध्ये उतरताच मोदींनी सर्वप्रथम काय केले, तर अडवानींच्याच तोंडावर पहिला ठोसा मारला आणि त्यांना अपमानित केले,' असे राहुल येथे म्हणाले. प्रशिक्षकाला मारल्यानंतर या "बॉक्‍सर'ने नोटाबंदी आणि "गब्बरसिंग टॅक्‍स'च्या साह्याने छोट्या दुकानदारांना मारले, अशी टीकाही राहुल यांनी केली.

Web Title: 56 Inch Boxer Punched His Coach Advani Ji In Face Says Rahul Gandhi


संबंधित बातम्या

Saam TV Live