...म्हणून आपण थेट देवाशी संवाद साधत असल्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

औरंगाबाद जिल्ह्यातील एक भोंदू बाबा लोकांना हातोहात फसवतोय. साम टीव्हीनं या भोंदू बाबाचा पर्दाफाश केलाय. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण थेट देवाशी संवाद साधतो असा दावा या भोंदू बाबानं केलाय. जफरबाबा असं या भोंदू बाबाचं नाव असून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जोगलादेवी या गावात हा बाबा राहतो.

दर गुरुवारी या बाबाचा दरबार भरत असतो. या बाबाचा दावा आहे की, तो थेट देवाशी बोलणं करतो. त्यानंतर तो आलेल्या लोकांना उपाय सांगतो. या बाबाच्या दाव्याचा पर्दाफाश करण्यासाठी साम टीव्हीचे प्रतिनिधी थेट बाबाच्या दरबारात पोहचले आणि या बाबाच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला.  

21 व्या शतकातही जिथं विज्ञान तंत्रज्ञानानं प्रगती केलीय. तिथं लोक अशा भोंदू बाबाला बळी पडतायेत. अशा बाबांवर कारवाई कधी होणार हाच खरा सवाल आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live