ओडिशातील शेतकऱ्यांना 10 दिवसांमध्ये कर्जमाफी - राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

भुवनेश्वर : मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, 2-3 महिने राहिले आहेत. माझे लक्षपूर्वक ऐका. ओडिशा राज्यात काँग्रेसची सत्ता येईल. तुम्ही फक्त 10 पर्यंत काऊंट करा. फक्त 10 दिवसांमध्ये ओडिशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) दिले.

ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजित जाहीरसभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी उपस्थित जनतेला उद्देशून ते म्हणाले, तुम्ही घाबरू नका. दहा दिवसांत काँग्रेसकडून शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल.

दरम्यान, येत्या काही महिन्यात ओडिशा राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी बोलत होते.

Web Title: Debt forgiveness in 10 days in Odisha says Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Saam TV Live