मदन भोसले भाजपमध्ये जाण्यासाठी गावागावांत बैठका सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मार्च 2019

भुईंज - गेली अनेक दिवस किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना आता वाई तालुक्यातील गावागावातून भोसले यांनी भाजपमध्ये जावे यासाठी सहविचार बैठका सुरू झाल्या आहेत.

भुईंज - गेली अनेक दिवस किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना आता वाई तालुक्यातील गावागावातून भोसले यांनी भाजपमध्ये जावे यासाठी सहविचार बैठका सुरू झाल्या आहेत.

या बैठकात भोसले यांना कांग्रेस पक्षाने दिलेली दुय्यम दर्जाची वागणूक, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाने किसन वीर भुईंज, किसनवीर खंडाळा, जावळीतील प्रतापगड या तिन्ही कारखान्यावर वेळोवेळी आणलेल्या अडचणी व त्यातून बाहेर पडण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्री व मंत्र्यानी केलेले प़त्यक्ष सहकार्य याचा उहापोह करीत येत्या आगामी काळात मदनदादांनी भाजपामध्ये जावे अशी प्रत्येकाची भावना होती तर बैठकीच्या निमिताने उपस्थित असणारे मदन भोसले यांचे चिरंजीव केतन भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेत संपूर्ण जिल्हाभरातून कार्यकर्त्यांचा वाढता दबाव विचारात घेवून दादा योग्य तो निर्णय घेतील असे सांगितले.

दरम्यान, गेली अनेक निवडणुका हातांचा पंजा कांग्रेस चाहती विचाराची नाळ जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांना या निमिताने आपल्या भावना मांडताना द्विधा मनस्थिती असली तरी राजकारणात बदल घडत असल्याने काळाबरोबर बदलले पाहिजे ही वस्तुस्थिती असल्याचे सांगत दादा आता तुम्ही बदला तरच इंथला संस्कार टिकेल व राज्यातील सहकाराला दिशा मिळेल असा सूर कार्यकर्त्यांतून उमटत आहे.

Web Title: Madanji Now decide to go to BJP says His Workers


संबंधित बातम्या

Saam TV Live