भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात..  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घडवनू देण्यासाठी तृप्ती देसाईंनी पोलिसांना पत्र लिहिलं होतं. सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात तृप्ती देसाई यांनी मोदींशी चर्चा करण्यासाठी पोलिसांकडे वेळ मागितला होता. मात्र, पोलिसांनी तृप्ती देसाईंची मागणी फेटाळली. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा अडवण्याची धमकी तृप्ती देसाई यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतलंय. 

साईबाबांचा १०० वा पुण्यतिथी उत्सव सुरू आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा समारोप आज होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल होतील. याठिकाणी शिर्डी संस्थान उभारत असलेल्या दर्शनबारी, शैक्षणिक संकुल, साई गार्डन, नॉलेज पार्क आणि सोलार प्रोजेक्टचे भूमिपूजन मोंदींच्या हस्ते होईल. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या दौर्यादरम्यान संपूर्ण शिर्डीत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.   

WebTitle : marathi news bhumata brigade trupti desai in police custody 

संबंधित बातम्या

Saam TV Live