5 ऑगस्टला अयोध्येला भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला, मात्र त्यावरुन राजकीय परिस्थिती तापली...

साम टीव्ही
सोमवार, 20 जुलै 2020

शिवसेना आणि श्रीरामाचं नातं राजकीय नाही ते कायमचं नातं आहे. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलंय. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे नेहमीच रामललांचं दर्शन घेण्यासाठी जातात, ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हा गेले होते आणि मुख्यमंत्री झाल्यावरही गेले.

शिवसेना आणि श्रीरामाचं नातं राजकीय नाही ते कायमचं नातं आहे. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलंय. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे नेहमीच रामललांचं दर्शन घेण्यासाठी जातात, ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हा गेले होते आणि मुख्यमंत्री झाल्यावरही गेले. राजकारणासाठी आम्ही अयोध्येत जात नाही असं संजय राऊत म्हणालेत. उद्धव ठाकरे 5 ऑगस्टला अयोध्येला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार का या प्रश्नावर राऊत यांनी हे उत्तर दिलंय. त्याचबरोबर शरद पवारांच्या राम मंदिराबाबतच्या वक्तव्यावरही संजय राऊत यांनी स्पष्टिकरण देण्याचा प्रयत्न केलाय. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हुसैन दलवाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राममंदिराच्या भूमिपूजनावरून टिका केलीय. दलवाई यांनी सांगितले की कोरानाचे संकट आणि आपल्या धर्मनिरपेक्ष देशाच्या पंतप्रधानांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाऊ नये. माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सोमनाथ मंदिराच्या भूमिपूजनाला जाणे टाळले होते. मोदी यांनी नेहरूप्रमाणे याबाबत निर्णय घ्यावा, असा सल्ला हुसैन दलवाई यांनी मोदींना दिलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live