भुसावळ, भादली, जळगाव रेल्वेस्थानकांदरम्यान पाच तासांचा मेगा ब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 जुलै 2018

भुसावळ, भादली, जळगाव या रेल्वेस्थानकांदरम्यान पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणारे. त्यामुळे काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यात. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस डाऊन ही कोल्हापूरवरुन ७ जुलैला सुटणारी गाडी भुसावळला ८ जुलैला रद्द झाली आहे. गोंदियावरून ९ जुलैला सुटणारी हीच गाडी भुसावळला ९ जुलैला रद्द करण्यात आली आहे. सुरतवरून ७ जुलैला सुटणारी सुरत-भुसावळ पॅसेंजर ही गाडी ८ जुलैला जळगाव स्टेशनपर्यंतच धावेल. दरम्यान, रेल्वेचा पूल कोसळणे, पाऊस, नवा पूल बांधणे, रुळ बदलणे आदी कारणांमुळे रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत आहेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live