BIG BREAKING | औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकला आला बिबट्या

सिध्देश सावंत
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

औरंगाबादमधील सिडको एन १ भागात बिबट्या शिरला आहे. या ठिकाणी बिबट्या आढळल्याने  लोकांमध्ये  खळबळ उडाली आहे. बिबट्या शहरातील मुख्य वस्तीत फिरत असल्याने भीती व्यक्त करण्यात आली आहे.

वन खात्याचे अधिकारी आणि पोलिस बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सकाळी उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या एका महिलेला बिबट्या दिसून आला. तिने आरडाओरड करुन लोकांना बोलावलं. बिबट्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

वन विभागाचे पथक बिबट्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे भरवस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढले आहे.
 
webTittle: Bibeta arrives at Morning Walk in Aurangabad

संबंधित बातम्या

Saam TV Live