VIDEO | सत्ता बदलाचा असाही परिणाम... नागपुरात रुग्णांची प्रचंड गैरसोय

VIDEO | सत्ता बदलाचा असाही परिणाम... नागपुरात रुग्णांची प्रचंड गैरसोय

सत्ताबदलानंतर नागपूरातील मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधी कार्यालय मुंबईत हलवण्यात आलंय. यामुळं विदर्भातल्या रुग्णांची मोठीच गैरसोय़ होणार आहे. काय नेमके काय परिणाम झालेत पाहुयात सविस्तर विश्लेषण...

उगवत्या सुर्याला सलाम करणं ही आपल्या राजकारणाची रित..त्याचाच प्रत्यय सध्या देवेंद्र फडणवीसांना आलाय. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी मंत्रालयासोबतच नागपुरातही मुख्यमंत्री कार्यालय सुरु केलं होतं. इथून वैद्यकिय सहाय्यता निधीच्या वितरणाचंही काम चालत असे. मात्र, सत्ता पालट होताच, प्रशासकीय पातळीवरचं नागपूरचं महत्वही कमी झालं आणि नागपूरातील मुख्यमंत्री कार्यालयाला टाळं लागलंय. 

खरं तर नागपुरातील मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधीचं कार्यालय म्हणजे विदर्भातील हजारो रुग्णांना हक्काचा आधार होता. गेल्या पाच वर्षांत या कार्यालयातून 6 हजार 200 रूग्णांना तब्बल 50 कोटींचं वाटप करण्यात आलंय. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकाला मुंबईला वारंवार हेलपाटे घालावे लागतात. ही बाब लक्षात घेता आजारपणामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या रुग्णांना  दिलासा देण्यासाठी नव्या सरकारने फक्त विदर्भातीलच नव्हे तर इतरही प्रादेशिक भागात मुख्यमंत्री सहायता निधीची कार्यालये सुरू करण्याची गरज आहे.

Web Title - big change in nagpur due to change of government 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com