VEDIO | वजनदार मंत्रिपदांसाठी सत्ताधाऱ्यांमध्ये लाॅबिंग सुरु

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

ठाकरे सरकारमध्ये आता मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झालीय. वजनदार मंत्रीपदं मिळावीत यासाठी तिनही पक्षातील आमदारांनी लॉबिंग सुरु केलीय.

 

ठाकरे सरकारमध्ये आता मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झालीय. वजनदार मंत्रीपदं मिळावीत यासाठी तिनही पक्षातील आमदारांनी लॉबिंग सुरु केलीय.

 

ठाकरे सरकार विराजमान झाल्यानंतर आता मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहयाला मिळतेय. वजनदार मंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येक पक्षानं फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय. वजनदार मंत्रिपदांसाठी आमदारही सरसावलेत. तिसऱ्या-चौथ्या टर्मला आमदार म्हणून निवडून आलेल्या, पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि हायकमांडच्या मर्जीतल्या अनेकांनी जोरदार लॉबिंग करायला सुरुवात केलीय.

शिवसेनेचे तानाजी सावंत, आशिष जैसवाल रामदास कदम, गुलाबराव पाटील, दादा भुसे या आमदारांची नावं चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, नरहरी झिरवळ, प्रकाश गजभिये या आमदारांची वर्णी मंत्रिपदावर लागू शकते. काँग्रेसकडून नाना पटोले, सतेज पाटील, केसी पडवी, यशोमती ठाकुर, रणजित कांबळे, विश्वजीत कदम ही नावं मंत्रिमंडळात दिसू शकतात. 
पक्षातील वरिष्ठ आमदारांना मंत्रिपदं मिळणार हे निश्चित आलंय. पण पडत्या काळात पक्षासोबत राहिलेल्या, पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणाऱ्या चेहऱ्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार हे निश्चित आहे. प्रादेशिक समतोल साधण्यासाठीही काही नावांची वर्णी लागणार आहे. त्यामुळेच मंत्रीपद मिळवण्यासाठी आता रस्सीखेच सुरु झालीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live