MPSC च्या जाहिरातीमुळे धनगर, वंजारी उमेदवारांत संतापाची लाट!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 मार्च 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षकपदाच्या 650 जागांसाठी जाहिरात काढण्यात आलीय. या जाहिरातीमुळं नवा वाद निर्माण झालाय. यामध्ये आरक्षणानुसार जागावाटप झालं नसल्याचा आरोप धनगर आणि वंजारी समाजाच्या विद्यार्थ्यांनी केलाय.गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला डावललं जात असल्याचा  आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय

मुंबई: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षकपदासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत एनटी ड (वंजारी आणि तत्सम) प्रर्वगाला एकही जागा नाही तर एनटी क (धनगर आणि तत्सम) प्रवर्गासाठी फक्त दोन जागा आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रवर्गातील उमेदवारांत संतापाची लाट उसळली आहे. याची दखल घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी केली आहे. 

जानकर यांनी कालच यासंदर्भातील पत्र उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब पोलिस उपनिरीक्षकपदाच्या 650 जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत एकूण 650 जागांपैकी 475 जागा ह्या विविध प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. परंतु शासन निर्णयाप्रमाणे एनटी क प्रवर्गासाठी 3.5 टक्के जागा राखीव असताना केवळ 2 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाप्रमाणे 22 जागा असायला पाहिजे होत्या. तसेच एनटी ड प्रवर्गासाठी 2 टक्के जागा राखीव असताना एकही जागा आरक्षित नाही. त्यामुळे या परिक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. एनटी क आणि एनटी ड उमेदवारांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आपण स्वत: निर्देश देवून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करावी, असे जानकर यांनी म्हटले आहे.

PSI,STI,ASO पदांसाठी जाहिरात निघाली. एकूण 806 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केलीय.. त्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 650 जागा आहेत. मात्र या पदांमध्ये आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाला 24 जागा मिळणं अपेक्षित असताना फक्त दोन जागा मिळाल्याचा आरोप  विद्यार्थ्यांनी केलाय..650 जागांपैकी 475 जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित केलेल्या आहेत.

Web Title - marathi news big issue about mpsc reservation 


संबंधित बातम्या

Saam TV Live