रियाने सुशांतच्या खात्यातून पैसे नेमके काढले कशासाठी? काळ्या जादूसाठी रियाने वापरले सुशांतचे पैसे?

साम टीव्ही
सोमवार, 24 ऑगस्ट 2020
  • काळ्या जादूसाठी रियाने वापरले सुशांतचे पैसे?
  • सुशांतच्या कुटुंबीयांच्या आरोपाने मोठी खळबळ
  • रियाने सुशांतच्या खात्यातून पैसे नेमके काढले कशासाठी?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मोठा वादंग उठलाय. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. त्यातच आता सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनी खळबळ माजलीय. सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती आणि काळी जादू. काय आहे हा संशयाचा त्रिकोण. पाहूयात.

सुशांतवर काळी जादू करण्यासाठी ही असली पूजा केली गेलीय का? होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करण्यासाठी अंधश्रद्धेतून केली जाणारी ही काळी जादू रियाने सुशांतवर केलीय का? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जातायत. आणि या प्रश्नांचा रोख रिया चक्रवर्तीकडे जातोय. रिया चक्रवर्ती. सुशांतसिंह राजपूतची प्रेयसी. तिनेच काळ्या जादूसाठी सुशांतच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केलाय.

रियाने सुशांतवर केली काळी जादू?
पूजा करण्यासाठी रियाने सुशांतच्या खात्यातून 2 लाख 93 हजार काढल्याचा आरोप होतोय. एवढी मोठी रक्कम काढूनही रियाने कसलीही पूजा केली नसल्याचाही आरोप केला गेलाय. कसलीही पूजा केल्याची नोंद नसल्याने रियाने काळी जादू केल्याचा आरोप होतोय. खात्यातून काढलेल्या पैशांची नोंद सुशांत नेहमी करतो, मात्र, लहान-सहान व्यवहारांची नोंद सुशांत करत नसल्याने संशय घेतला जातोय.

रियाने सुशांतच्या मुंबईतल्या घरी घातलेली पूजा एव्हाना जाहीर झालीय. त्याचा व्हिडीओही समोर आलाय. मात्र, 2019 साली सुशांतच्या खात्यातून काढलेल्या पैशांची नोंद सापडत नसल्याने संशय बळावलाय. त्यामुळे, रियाने सुशांतच्या खात्यातून पैसे नेमके कशासाठी काढले? आणि रियाने सुशांतवर काळी जादू केली का? या प्रश्नांची उत्तरं सीबीआय तपासातून पुढे येतीलच.


संबंधित बातम्या

Saam TV Live