बिहारमध्ये मद्यानंतर आता "खैनी'वर बंदी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 जून 2018

पाटणा  : दोन वर्षांपूर्वी मद्यावर बंदी घातल्यानंतर आता नितीश सरकार "खैनी'वर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून खैनीवरील बंदीची कार्यवाही सुलभ करावी, अशी लेखी मागणीही राज्य सरकारने केली असल्याची माहिती मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली. 

बिहारमध्ये मद्याबरोबर पान मसाला, गुटखा यावर अगोदरपासूनच बंदी असून, आता "खैनी'वरही बंदी घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यातील प्रत्येकी पाच व्यक्तींमध्ये एकाला "खैनी'चे व्यसन असून, यामुळे गंभीर आजार जडत आहेत. त्यामुळे तंबाखू व निकोटिनचा अंश असलेल्या सर्व उत्पादनांवर बंदी घालावी, तसेच अन्न सुरक्षा आणि प्रमाणन प्राधिकरणाने (एफएसएस) "खैनी'चा समावेश बंदी असलेल्या उत्पादनांच्या यादीत करावा, अशी विनंतीही आम्ही केली असल्याचे कुमार यांनी सांगितले. 
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) 2016-17 मधील अहवालानुसार, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत "खैनी' खाणाऱ्यांचे प्रमाण 20 टक्के आहे. दरम्यान, बिहारमध्ये गेल्या दशकभरात तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण घटल्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितले. 

ही तर नितीशकुमारांची खेळी 
"खैनी'वरील बंदीमुळे या व्यवसायाशी निगडित असलेल्या हजारो जणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असून, आपले अपयश झाकण्यासाठी नितीशकुमार यांनी ही खेळी खेळली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. "खैनी'वर खरंच बंदी घालण्याचे धाडस त्यांच्यात आहे का, असे आव्हानही विरोधकांनी नितीशकुमार यांना दिले आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live