मर्सिडीजच्या किंमतीत बाईक.. पाहा ही बाईक आहे तरी कोणती ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

आपल्याकडे श्रीमंत वर्गात लक्झरी कार्स वापरण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या वाहनप्रेमी मंडळींची मर्सिडिझ, स्कोडा, लँड रोव्हर, ऑडी या गाड्यांना पसंती असते. याशिवाय महागड्या स्पोर्ट्स बाईक्सकडेही अऩेकांचा ओढा आहे. अशीच एक बाईक  इंडियन या कंपनींनी भारतात लाँच केलीय. 

या बाईकची किंमत थोडी थोडकी नाही तर तब्बल 38 लाख रूपये आहे. बुलेटप्रेमींनाही हवीहवीशी वाटेल अशी ही बाईक एखाद्या लक्झरी कारच्या तोडीची आहे. या बाईकमध्ये लक्झरी कारमध्ये मिळणाऱ्या सुखसोई आहेत. 

शिफटेन एलिटमध्ये राईड कमांड इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आलंय तसंच ब्लुटुथ कनेक्टिव्हीटी, नेव्हिगेशन आणि 200 वॉटची ऑडिओ सिस्टिमही देण्यात आलीय. पाय ठेवण्यासाठी ऍल्युमिनिअमचा फ्लोअरबोर्ड देण्यात आलाय. या बाईकच्या पुढील चाकाला दोन डिस्क आणि मागील चाकाला एक डिस्क ब्रेक देण्यात आलाय..बाईकचं इंजिन 1800 सीसीचं असून वजन तब्बल 388 किलो आहे. या बाईकला मशीननं नव्हे तर हातानं रंग देण्यात आलाय. 

शिफटेन एलिट ही बाईक हार्ले डेव्हिडसनची स्ट्रीट ग्लाईड आणि होंडाच्या गोल्ड विंगला टक्कर देणारंय. अर्थात ही बाईक घेऊन वाऱ्याच्या वेगाशी तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर तुमचा खिसाही हलका करावा लागेल.

WEB TITLE : MARATHI NEWS BIKE OF WORTH RS 38 LAKHS LAUNCHED IN INDIA

संबंधित बातम्या

Saam TV Live